दारूम ग्रामस्थांनी श्रमदानाने ओढ्यावर बांधला वनराई बंधारा

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील दारूम येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने गावातील बारमाही वाहणाऱ्या ओढ्यावर वनराई बंधारा बांधला.

या बंधाऱ्याचा उपयोग येथील ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी वाढ होण्याबरोबर जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि हिवाळी पिके घेण्यासाठी होणार आहे.
सदर काम सुरु असताना गावच्या सरपंच तेजस्वी लिंगायत उपसरपंच प्रवीण तळेकर हे उपस्थित राहून जातीनीशी लक्ष घालून होते.
बंधारा बांधण्यासाठी प्रभाकर तळेकर, सुरेंद्र तावडे, अमित तळेकर, सदानंद राऊत, अशोक गिरकर, अजित तळेकर, प्रभाकर गुरव, प्रवीण तळेकर सत्यविजय गुरव, सतीश गिरकर, रोशन लिंगायत, रोहन लिंगायत, ऋषिकेश पांचाळ व इतर ग्रामस्थांनी श्रमदान केले.

You cannot copy content of this page