सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शरद मेस्त्री

⚡वेंगुर्ला ता.०९-: सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

  मंडळाच्या झाराप येथील कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीनंतर नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-रितेश  सुतार (वैभववाडी), सचिव-राजन पांचाळ (पिगुळी), खजिनदार-अनंत मेस्त्री (माणगांव), सहसचिव-गुरुनाथ मेस्त्री (साळगांव), सदस्य-आनंद मेस्त्री (वाडोस), महेश सुतार (कणकवली), नारायण सुतार (दोडामार्ग), सुनिल मेस्त्री व प्रभाकर मेस्त्री (वजराठ), राजन मेस्त्री (डिगस), शैलेश मेस्त्री (सावंतवाडी), महादेव मेस्त्री (पुळास), स्वप्नाली मेस्त्री व नारायण मेस्त्री (झाराप), बाबाजी मेस्त्री (मालवण) यांचा समावेश आाहे. मावळते अध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी शरद मेस्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
You cannot copy content of this page