किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मठात अभिषेक, पूजा

तालुकाप्रमुख महेश राणे, विश्वास गांवकर यांनी केली दीर्घायुष्यसाठी प्रार्थना

मालवण : (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न योजना कमिटी सदस्य तथा उद्योजक किरण (भय्याशेठ) सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वायंगणी येथील स्वामी समर्थ मठ येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विश्वास गांवकर यांच्या वतीने अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. किरण सामंत यांच्या दीर्घायुष्यसाठी स्वामी चरणी प्रार्थना करण्यात आली. तसेच दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिव किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, हर्षद पारकर, कामलाकांत पारकर, श्री. हळदणकर, ऋत्विक सामंत, शिवम हिर्लेकर, प्रसाद गोवेकर, श्री. गोवेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page