देवगड प.स.शिक्षण विभागात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार…

_प.स.सदस्य अजित कांबळे यांचा आरोप_

*💫देवगड दि.१०-:* देवगड पंचायत समितीच्या.शिक्षण विभागात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सन 2010 ते 2015 या कालावधीत झाला असून या संबंधित कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन कारवाई करावी. व फौजदारी गुन्हे दाखल करावेत .व लुबाडणूक केलेला पैसा चक्रवाढ व्याजासह वसूल करावा अशी आग्रही सूचना देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेत प.स.सदस्य अजित कांबळे यांनी केली .यावेळी सभागृहात एकच खळबळ माजली. देवगड पंचायत समिती मासिक सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती रवी पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ,यावेळी व्यासपीठावर उपसभापती रवी तिरलोटकर सचिव तथा सहा.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारात 4 कर्मचारी सहभागी असल्याचे ही श्री कांबळे यांनी सांगून त्यांची नावे जाहीर करू का?अशी विचारणा सभागृहात केली.यावेळी सचिव तथा सहा.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण योग्य ती चौकशी केली जाईल असे सांगितले.संबंधित विषयाची परिपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचेही श्री कांबळे यांनी सांगितले. सभेच्या प्रारंभी मुटाट हायस्कुलचा विद्यार्थी पार्थ परांजपे याची निसर्ग शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार सभागृहत करण्यात आला. या सभेत विविध खात्यांचा आढावा घेण्यात येत असताना तालुक्यात आरोग्य सेवक 15 पदे रिक्त आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोंडके यांनी दिली ही पदे लवकरात लवकर भरण्याकरिता प्रयत्न करावे अशी सूचना सदस्यांनी केली. एसटी आगाराच्या बहुतांशी फेऱ्या अद्याप बंद असून शाळा,महाविद्यालय सुरू झाल्याने त्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात.विजयदुर्ग देवगड ही दु.12.30 वा. देवगड वस्तीची प्रवासी फेरी व अन्य फेऱ्या सुरू कराव्यात अशी सूचना प.स.सदस्य शुभा कदम यांनी केली.या बाबत वरिष्ठ स्तरावर आवश्यक तो पत्रव्यवहार केल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. देवगड तालुक्यातील पाणी टंचाईचा आराखडा अद्याप गेलेला नसल्याने प.स.यानी तीव्र नाराजी व्यक्त केली.असता येत्या दोन दिवसात आराखडा पाठविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. फोटो-देवगड प.स.मासिक सभेत पार्थ परांजपे याचा सत्कार करताना मान्यवर

You cannot copy content of this page