*मत्स्य महोत्सवानिमित्त शालेय गटात चित्रकला स्पर्धेचे आयोजन

*आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची माहिती*

सावंतवाडी-: सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवानिमित्त ५ वी ते १० वी या शालेय गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. तसेच या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून, या स्पर्धेचा विषय ‘मासा किंवा शोभिवंत मासा ‘ हे असणार आहे. तसेच ही स्पर्धा सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथ भोसले स्मृती उद्यान येथे होणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page