सरपंच प्रियांका नाईक यांचे गौवरोद्गार
बांदा/प्रतिनिधी
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील बऱ्या वाईट घटना टिपण्याचे काम पत्रकार हे सातत्याने करत असतात. बांदा शहरातील पत्रकारिता ही निकोप असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले.
बांदा ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती नाईक बोलत होत्या. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामविस्तार अधिकारी श्री चव्हाण, श्रीप्रसाद वाळके, शैलेश केसरकर, मंदार महाजन, प्रितेश शेटकर, पत्रकार निलेश मोरजकर, मयूर चराटकर, जय भोसले, विराज परब, अजित दळवी, मंगल कामत आदी उपस्थित होते.
उपसरपंच जावेद खतीब म्हणाले की, महामार्गावर वसलेले बांदा शहर हे वेगाने विकसित होत आहे. अनेक विकासात्मक प्रकल्प शहरात साकारत आहेत. गेली अनेक वर्षे शहराच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान हे अतुल्य आहे. यापुढेही पत्रकारांनी आपल्या सकारात्मक लेखणीतून प्रशासनाला मार्गदर्शनाची भूमिका पार पाडावी.
