विद्यार्थ्यांनी हाताळली पोलिसांची हत्यारे

कामकाज पाहिले जवळून;
रायझिंग डे निमित्त देवगड पोलीस ठाण्याचा उपक्रम

देवगड
रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस ठाणे हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला भेटीचे आयोजन करणे या अनुषंगाने देवगड येथील शेठ म.ग.हायस्कुल मधील ,शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक समस्या सुरक्षा व वाहतूक नियम या विषयांवर मार्गदर्शन देवगड पोलीस स्थानकात करण्यात आले.तसेच पोलीस स्थानकाचे कामकाज,हत्यारे यांचीही माहिती देण्यात आली , शालेय मुलांना सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करणे , महिला संरक्षणासंबंधी कॉलेज विद्यार्थ्यांची रॅली काढणे अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये देवगड पोलीस स्टेशन मार्फत केले गेले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस हवालदार – राजन सदाशिव जाधव फकरुद्दीन आगा उदय शिरगावकर , महिला पोलीस नाईक – मृणालिनी सावंत, पोलीस शिपाई -शैलेश म्हेत्रे उपस्थित होते.
पोलीस हवालदार राजन जाधव यांनी मोबाईलचे दुष्परिणाम ,रायझिंग डे सप्ताहाची पार्श्वभूमी या बाबत फकरुद्दीन आगा यांनी, महिला पोलीस नाईक मृणालिनी सावंत यांनी युवक – युवतीना विशेष मार्गदर्शन केले..

You cannot copy content of this page