देवगड
शिवसेना देवगड तालुका यांच्या वतीने मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ममता दिन तमाम शिवसैनिकांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष श्रीमती साक्षी प्रभू व काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर उपस्थित होते त्याचप्रमाणे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर निवृत्ती तारी, तेजस मामघाडी नितीन बांदेकर व शिवसैनिक पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना देवगड तालुक्याच्यावतीने मासाहेब मीनाताई ठाकरे जयंती साजरी
