यशवंत शंकर भोसले
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* सायकलींगमुळे आरोग्य तर सदृढ राहतेच त्याशिवाय कार्यालयीन कामकाजामध्येही उत्साह वाढत असल्याचे अप्पर कोषागार अधिकारी यशवंत शंकर भोसले यांनी सांगितले. करण्यासाठी रेन्बो रायडर्स, ब्यूटीज ऑन व्हील्स, कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इन्पायर या नावाने सायकलींग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये 100 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर त्यांनी या भावना व्यक्त केल्या. या कामगिरीविषयी बोलताना श्री. भोसले म्हणाले की, सायकलींग मॅरेथॉनबाबत अप्पर कोषागार अधिकारी भालचंद्र सावंत यांनी माहिती दिली. श्री.सावंत यांनी गेल्या वर्षी वयाच्या 57 व्या वर्षी कारगिल दिनानिमित्त 100 किलोमीटर सायकलींग केले होते. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. रोटरी क्लब कणकवली, कनक रायडर्स यांच्या सोबत सायकल रॅलीमध्ये प्रथम सहभाग घेतला व सायकलींगची आवड निर्माण झाली. त्यातही दिव्यांग असलेले श्री. कांबळे, मकरंद सर, विष्णू रामागडे, संजय बिडवे, वैभव वाघाटे व प्रसाद बुचडे यांच्याकडून स्फूर्ती मिळत होती. कनक रायडर्स कणकवली तर्फे स्पर्धेमध्ये भाग घेऊन 5 तास 31 मिनीटामध्ये 100 कि.मी चे अंतर पार केले. सायकलींग सुरू केल्याचा मला खुपच फायदा झाला. कार्यालयीन कामकाजात उत्साही वाटू लागले. यासाठी कार्यालयचे प्रमुख डॉ. शिवप्रसाद खोत व माझे सहकारी भालचंद्र सावंत यांनी नेहमीच प्रोत्साहित केले. शासकीय कर्मचाऱ्यांना सतत बसून काम करावे लागत असल्याने त्यांनी सायकलिंग तसेच अन्य छंद जोपासल्यास कार्यालयीन कामकाज करण्यासाठी उत्साह वाढू शकतो असेही ते म्हणाले.
