*💫सावंतवाडी दि.१०-:* येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये वेर्ले येथील सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उपहारगृहाचे सुमारे तेरा हजार चारशे रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.याप्रकरणी संस्था चेअरमन राजेंद्र राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वेर्ले येथील सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्थेला उपहारगृह चालवण्यासाठी मंजुरी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कामवाटप अध्यक्ष समिती यांच्या लेखी आदेशाने दिले होती. त्यानुसार लोखंडी पाइप टाकून उपहारगृह शेड उभारण्यात आली होती दरम्यानच्या काळात हे उपहार गृह तुम्हाला चालवता येणार नाही असे पत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिल्याने संस्थेने हे काम थांबवण्यात आले होते त्यामुळे सदर कामासाठी शेड उभारण्यासाठी वापरलेले लोखंडी पाईप काढून त्याच ठिकाणी बांधून ठेवण्यात आले होते. संस्था अध्यक्ष श्री राणे आज उपजिल्हा रुग्णालय परिसरात गेले असतात सदर चे पाईप घटनास्थळी दिसून आले नाही याबाबत त्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये खात्री केली असता सदर चे पाईप दिसून आले नाहीत त्यामुळे सदर चे पाईप चोरीला गेल्या प्रकरणी त्याने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरातील लोखंडी पाईप ची चोरी
