*💫दोडामार्ग दि.१० सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयानी जमिन अतिक्रमण करुन लागवड केलेल्या परप्रांतीय जमिन मालक व कामगार यांची पोलीस पडताळणी करण्यात यावी अशी भारतीय जनता युवा मोर्चा दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक गवस यांनी आज दोडामार्ग तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी तहसीलदार यांची कार्यालयात भेट न झाल्याने सदर निवेदन नायब तहसीलदार नाना देसाई यांच्याकडे देण्यात आले.तसेच सदर दोडामार्ग पोलीस ठाण्यातही लेखी निवेदन देण्यात आले. गवस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यात विशेषकरुन तिलारी,तेरवण-मेढे शिरंगे, विजघर या भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी स्थानिक लोकांच्या जमिनी विकत घेऊन लागवड केलेली आहे.व काही जमिनीवर अतिक्रमण देखील केलेले आहे. स्थानिक लोकांना या परप्रांतीय मालक व कामगारांकडून दमदाटी व धमकी देणेचे प्रकार काही वर्षापासून होत आहेत.सदर कामगार अंमली पदार्थांचे सेवन करित असल्याच्या स्थानिकांच्या तोंडी तक्रारी आमच्याकडे आहेत.अंमली पदार्थांची लागवड या परप्रांतीयांकडून केली जात असल्याचा संशय देखील आम्हाला आहे.दि.०८/०२/२०२१ रोजी कोनाळ येथील सरपंच पराशर सावंत यांना अशाच एका परप्रांतीयांनी काही स्थानिक लोकांना हाताशी धरुन दमदाटी व धमकी दिली. कोनाळ ग्रामपंचायतीत येऊन सरपंचांना धमकावण्याच्या प्रकारामुळे तालुक्यात परप्रातीयांची मुजोरी वाढली आहे.याचा आज प्रत्यय आलेला आहे.अशा प्रकारामुळे तालुक्यात लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.असे अनेक प्रकार दोडामार्ग तालुक्यात घडलेले आहेत.केरळ मधील कुविख्यात हत्ती तस्कर आत्महत्या प्रकरण ? परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात केलेली गांजा लागवड अशी अनेक प्रकरणे पैशांच्या जोरांवर दडपण्यात आलेली आहेत.यावरुन असे दिसून येते की,दोडामार्ग तालुक्यात येणारे परप्रांतीय मालक व त्यांचे मजुर हे गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यात या परप्रांतीयांकडून तालुक्यातील लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज या परप्रांतीयांकडून स्थानिकांना हाताशी धरुन आपले काम पैशाच्या जोरावर करुन घेण्यासाठी तालुक्यातील सरपंचाना धमकवण्याचा प्रकार समोर आला आहे. सरपंचाना अशी धमकी ही मंडळी देत असतील तर भविष्यात सर्वसामान्य लोकांचे काय ? त्यामुळे तालुक्यात असणाऱ्या परप्रांतीयांची सखोल चौकशी व पोलीस पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे परप्रातीयांविरोधात आंदोलन करण्यात येईलअसा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक दशरथ गवस यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी चेतन चव्हाण, देवेंद्र शेटकर, समीर रेडकर,रामचंद्र मणेरीकर,विष्णू रेडकर, संदेश म्हावळणकर,अजय दळवी सह आदी उपस्थित होते.
_परप्रांतीय जमिन मालक व कामगार यांची पोलीस पडताळणी करावी-:दीपक गवस….
