परप्रांतियांना प्राधान्य दिल्यास मनसे आक्रमक होणार;राजू कासकर, आशिष सुभेदार यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मध्ये उद्या होणाऱ्या रोजगार मेळाव्याचे स्वागत आहे. पण त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य हे जिल्ह्यातील मुलांना देण्यात यावे अशी मनसेची मागणी आहे. उद्याच्या होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी परप्रांतीय शहरात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे पहिले प्राधान्य हे जिल्ह्यातील स्थानिकांना द्यावे जर त्या ठिकाणी परप्रांतीयांना पहिले प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले तर मनसे स्थानिकांच्या पाठीशी खंबीर उभी राहणार असून परप्रांतीय विरुद्ध तीव्र भूमिका घेणार असल्याचे मनसेचे पदाधिकारी राजू कासकर व आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
