ओटवणे सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते सत्कार

⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील ओटवणे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच आत्माराम गावकर व उपसरपंच काँग्रेसचे संतोष कासकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा ओटवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे,संदिप सुकी,सुधीर मल्हार, काँग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अभय मालवणकर,सगुण गावकर इत्यादी उपस्थित होते

You cannot copy content of this page