चुनवरे येथे ७ रोजी भालचंद्र गावडे महाराज पुण्यतिथी

⚡मालवण ता.०४-: मालवण तालुक्यातील येथील चुनवरे येथील प. पू. भालचंद्र गावडे महाराज यांचा प्रथम पुण्यतिथी सोहळा दि. ७ जानेवारी रोजी चुनवरे येथील त्यांच्या समाधिस्थानी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दुग्धाभिषेक व आरती, नंतर सत्यनारायण महापूजा, आरती, तिर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने, नित्य हरिपाठ, आरती तसेच ८ जानेवारी रोजी पहाटे काकड आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अवधूत स्वामी भालचंद्र गावडे महाराज भक्त मंडळ न्यास (चुनवरे) तर्फे कार्याध्यक्ष उत्तम गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page