तेरेखोल नदीतील सावरजुवा खाडीत वाळू माफियांवर कारवाई

महसूल विभागाने होडी, वाळू जप्त करीत झोपड्या केल्या उध्वस्त

⚡सावंतवाडी ता.०४-: आरोंदा सावरजुवा येथे तेरेखोल खाडीत महसूल विभागाने वाळू माफियावर कारवाई करुन होडी व चार ब्रास वाळू जप्त केली.कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्याही उध्वस्त केल्या.वाळू काढण्यासाठी बांधण्यात आलेला रॅम्पही महसूल विभागाने उध्वस्त केला.

वाळू उत्खनन करणारे कामगार तसेच वाळू भरलेला डंपर चालकासह फरार झाला. तलाठी डी .पी पास्ते यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. वाळू उपसा करणाऱ्याचा शोध सुरू असून त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे असे पास्ते यानी सांगितले आरोदा तेरेखोल खाडीत बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन होते अशा तक्रारी गेले काही दिवस महसूल विभागाकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

You cannot copy content of this page