Headlines

नट वाचनालयात निबंध स्पर्धेचे आयोजन

⚡बांदा ता.०४-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे औचित्य साधून नट वाचनालय बांदा येथे शनिवार दिनांक २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत “कै. परशुराम लाडू नाईक व कै. लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ” शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘माझा छंद’, ‘माझ्या गावची जत्रा’ हे विषय ठेवण्यात आले असून शब्दमर्यादा ५०० शब्द आहे. तर यासाठी वेळ १ तास देण्यात आला आहे. आठवी ते दहावी गटासाठी ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे कार्य’, ‘ऑनलाईन अभ्यास फायदे की तोटे’ हे विषय ठेवण्यात आले असून शब्द मर्यादा ७०o शब्द आहे. यासाठी वेळ १ तास देण्यात आला आहे.
दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा वाचनालयात होणार आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे वाचनालयात दिनांक २५ पर्यंत आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो. ९४०५५७०३४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page