⚡कणकवली ता.३०-: कै.सौ. रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्ट मठ – वेंगुर्लेतर्फे आनंदाश्रय अणाव येथे अन्नदान करण्यात आले. अन्नदानाचा हा उपक्रम कै.सौ. रुक्मिणी फटू मठकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
२००९ साली या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्ट तर्फे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर या सारखे अनेक उपक्रम केले जात आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या उत्पन्नातून काही भाग समाजासाठी खर्च करून सामाजिक कार्य करून समाजाचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे श्री. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव फटू मठकर( निवृत्त अधीक्षक जिल्हा व सत्र न्यायालय ओरस – सिंधुदुर्ग )यांनी सांगितले.
मठकर यांच्या सामाजिक कार्याची दखल जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर घेतली गेली आहे. थायलंड- बँकॉक येथे पण मठकर यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. यावेळी विचार मांडताना श्री. मठकर म्हणाले की, समाजकार्य करताना प्रखर ईच्छाशक्ती , प्रामाणिकपणाची गरज आहे. त्याचवेळी सहका-यांची कौतुकाची थाप अजून सामाजिक कार्य करण्यास बळ देते याचा आवर्जुन उल्लेख केला. आपल्या जडणघडणी मध्ये आई , भाऊ, शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे तसेच यशस्वी होण्यामागे पत्नीचे महत्वपूर्ण योगदान आहे असे आवर्जून सांगितले. मुलांना उच्चशिक्षित करण्यात पत्नी नम्रता हिचा मोठा वाटा असल्याचे मठकर यांनी नमूद केले.
यावेळी मठकर यांचे सहकारी मधुकर सावंत , मोहन नाईक यांनी आपले विचार मांडले. बबन परब यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कै. रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्ट मठतर्फे आनंदाश्रय येथे अन्नदान
