Headlines

आरोस विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार प्रदान

आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ -: महाराष्ट्र पुरोगामी आघाडी व कोकण विभाग शिक्षक विधानपरिषद आमदार बाळाराम पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्दमाने देण्यात येणारा ‘कोकण रत्न पुरस्कार ‘आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांना आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते ओरोस येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
देसाई हे गेली ३१ वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या ह्या सन्मानाबद्दल आरोस पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आजी माजी विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी विकास सावंत, संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page