⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील असरोंडी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक हाती सत्ता आल्यानंतर आज उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बाळकृष्ण (आदित्य) सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सरपंच अनंत पोईपकर यांनी आपला पदभार स्वीकाराला तसेच बिनविरोध उपसरपंच निवड झालेल्या बाळकृष्ण (आदित्य) सावंत यांनीही पदभार स्वीकारला.
यावेळी सर्व सदस्य, ग्रामसेवक सौ. घाडी, माजी सरपंच दिलीप घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (भाऊ सावंत ), पोलीस पाटील लवू सावंत, शाखा प्रमुख सुनील सावंत, प्रकाश सावंत, अनंत सावंत, मोहन परब, अनिल सावंत, प्रदिप सावंत, मोहन सावंत, संदीप सावंत, सत्यविजय परब, राजू परब, बबलू परब, दीपक माने, अंकुश सावंत व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी असरोंडी गावच्या इतिहासात प्रथमच गावातील सर्व जेष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनी यांना विजयी उमेदवार व शिवसेना पदाधिकारी यांनी निमंत्रित करून सर्व मंडळींचा सत्कार केला.
