*पालकमंत्र्यांनी आश्वासनांची पूर्तता न केल्याने जिल्हा अध्यापक संघाचे धरणे आंआंदोल*

*जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर १५ फेब्रुवारीला करणार धरणे आंदोलन

सिंधूदुर्गनगरी ता ९ पालकमंत्री उदय सामंत यानी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देवूनही त्याची पूर्तता न झाल्याने सिंधूदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ १५ फेब्रूवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन करणार आहे. याबाबत १ फेबुवारी रोजी संघटनेच्या झालेल्या कार्यकारिणी सभेत एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक त्रुटि पूर्ण करून दिल्या आहेत. तरीही माध्यमिक शिक्षण विभाग जाणून बुजुन याबाबतची कार्यवाही केलेली नाही. याबाबत पालकमंत्री सामंत यांना २६ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आठ दिवसांत प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले होते. हा कालावधी उलटून गेला तरी आश्वासन पूर्ण झालेले नाही. कोविड कालावधीत माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शासनाच्या सूचनांचे पालन केले. नेहमी सहकार्य करीत असताना शिक्षण विभाग प्रलंबित समस्या सोडविण्यात आलेल्या नसल्याने नाईलाजास्तव सनदशिर मार्गाने न्याय मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले आहे.

You cannot copy content of this page