*💫सावंतवाडी दि.०९-:* येथील न्यू खासकीलवाडा समाज मंदिर परिसरातील २३ वर्षीय एक युवती काल सायंकाळपासून बेपत्ता असल्याची खबर तिचे वडील सिराज मेहत्तर यांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात दिली असून, त्यानुसार पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. काल संध्याकाळी कोणालाही न सांगता संबंधित युवती घरातून निघून गेली असून, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिच्याशी संपर्क होत नसल्याने , तसेच सर्वत्र शोधाहोध करून देखील न सापडल्याने तिच्या वडिलांनी पोलिस स्थानकात येत याबाबत खबर दिली आहे.
*सावंतवाडी येथील युवती बेपत्ता
