वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सबसिडी द्या…

*मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची वनविभाग अधिकाऱ्यांकडे मागणी*

*💫सावंतवाडी दि.०९-:*  विलवडे येथे गवा रेड्याने शेतात घुसून नुकसान केल्याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास अजुन देखील नुकसानभरपाई न मिळाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडी येथील वनविभागाला धडक देत वनविभाग अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला आहे.  

यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वन विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच राज्य सरकार कडे मागणी करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे असे देखील ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page