शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला भव्य दिव्य कार्यक्रम : उल्लेखनीय कार्याबद्दल मिळाला पुरस्कार
⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील पुरस्कृत कोकण रत्न पुरस्कार 2022 शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य बद्दल आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असल्याने कोकण रत्न 2022 आदर्श शिक्षक पुरस्काराने शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात आरोंदा हायस्कूलचे शिक्षक चंदन गोसावी यांना सन्मानित करण्यात आले.
श्री गोसावी हे शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात कायमच पुढे असतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
