विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसचे उद्या स्नेहसंमेलन

⚡बांदा ता.२९-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष नारायण कामत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

सकाळी 8 ते 10 वा. वेशभूषा व फनी गेम्स, सायंकाळी 6.30 वाजता जल्लोष 2022 सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश परब, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शालेय मुख्यमंत्री अपूर्वा नाईक, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुषमा मांजरेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page