लिहिते हात राबले समाजासाठी; ग्रामस्थांमधून समाधान

⚡वेंगुर्ला ता.२९-: येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय निवासी शिबिर परबवाडा येथे पार पडले. यावेळी नजिकच्या कणकेवाडी येथील बंधारा बांधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकर घेत ग्रामस्थांच्या मदतीने तो पूर्णत्वास नेला. एरव्ही लिहिते हात समाजासाठी राबल्याने ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.


बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी परबवाडा उपसरपंच पपू परब, सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, सुहिता हळदणकर, माजी सदस्य संजय माळगांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, प्रमोद नाईक, जीवन परब, नाना राऊळ, विश्वास पवार यांच्यास ग्रामस्थ, प्राध्यापक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page