ह्युमन राईट्स असोशिएशनतर्फे माळगाव येथे ३१ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.२९-: माळगाव पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांसाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन ( सिंधुदूर्ग ) व लायन्स आय हॉस्पिटल ( कणकवली ) यांच्या संयुक्त विद्यमानाने ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूल मळगाव ता. मालवण येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 तरी या मोफत नेत्र तपासणी शिबिरात लाभ घेणार्‍यांना रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशन्स, लेन्स बसवणे, आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील.या शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी करून फेको तंत्रज्ञानाद्वारे बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा व बाल नेत्रोपचार, अचूक चष्मा नंबर, शस्त्रक्रिया पूर्वक सखोल तपासणी व्यवस्था, बाह्यपटल व अंतरपटल शस्त्रक्रिया विशेष नेत्र तज्ञांकडून करण्यात येईल.
    नोंदणी संपर्कासाठी राजेश लब्दे - 9423806336 , अर्जुन परब - 7588903348 , रोहित हडकर - 9421236294, बंडू माळकर - 9420864810

यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करण्यात यावी.

 या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ माळगाव पंचकोशीतील सर्व नेत्र रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ह्युमन राईट्स असोशियशन फॉर प्रॉटेक्शनचे कोकण विभाग अध्यक्ष - संतोष नाईक व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष - मनोज तोरस्कर तसेच मालवण तालुका अध्यक्ष सुधीर धुरी यांनी केले आहे.
You cannot copy content of this page