धुवून पार्क केलेली बोलेरो पीक अप आढळली धावत्या ट्रकवर

शहरातील घटना; बोलेरो पीक अपचे मोठे नुकसान

⚡सावंतवाडी ता.२९-: येथील जेल नजीक बोलेरो गाडी अचानक उतारावर सुटून समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने बोलेरो गाडीचे मोठ्या नुकसान झालं आहे. हा अपघात आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील जेल नजदीक एका सर्विसिंग सेंटरमध्ये बोलेरो पीक अप धुवून उताराच्या दिशेने लावली होती. मात्र, ती अचानक सुटून समोरून जाणाऱ्या ट्रकवर जोरदार आढळली. यात बलेरो पिकप चे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

You cannot copy content of this page