नावळे उपसरपंचपदी भाजपचे संजय रावराणे

वैभववाडी प्रतिनिधी
नावळे गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपच्या माजी तालुका अध्यक्ष संजय रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले
यावेळी नावळे गावच्या सरपंच कुमारी सोनल गुरव, वैभववाडीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सरपंच लक्ष्मण रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव, माजी सरपंच संभाजी रावराणे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके गंगाराम गुरखे, कविता सुतार, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या स्नेहा शेळके, रश्मी गुरव, पल्लवी गुरव, ग्रामस्थ रमेश शेळके अनिल शेळके, सोनू गुरखे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव, आत्माराम पाटील, संतोष गुरव, यशवंत उर्फ तात्या रावराणे, माजी सरपंच गणपत सुतार भाजपचे गजानन पाटील, भगवान मोसमकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page