वैभववाडी प्रतिनिधी
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी कोळपे गावचा इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला या सरपंचांचा व त्यासोबत त्यांच्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी स्वतः खासदार विनायक राऊत त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर ,अतुल रावराणे, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव आदि उपस्थित होते.
यावेळी कोळपे गावचे सरपंच सुनील कांबळे, तिरवडेचे सरपंच जितेंद्र तळेकर, तसेच तिथवली ग्रामपंचायत सदस्या रिहाना काझी, चित्रा हरयाण,सायली धुरी, नानिवडे ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, प्रमिला महाजन, कोळपेचे ग्रामपंचायत सदस्य, सईदा इसफ, रजिया ठाणगे, दिलीप कांबळे,शुभांगी कांबळे,विलास माने, तिरवडेचे सदस्य सुहास गुरव यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले कोळपे गावात विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द देखील दिला. लवकरच कोळपे गावातील भुसारवाडी व जमातवाडी येथे स्ट्रीट लाईट साठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार असे राऊत यांनी सांगितले.येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका ह्या संपूर्ण ताकतीनिशी लढवून इथला पंचायत समितीचा सदस्य व जिल्हा परिषद सदस्य हा शिवसेनेचा असेल यासाठी सगळ्यांनी जोरदार काम करा असं आव्हान राऊत यांनी केले.*
यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल सरवटे, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, विभाग संघटक विलास पावसकर,विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर,उपविभाग प्रमुख गौस पाटणकर,सरपंच सुनील कांबळे, करीम इसफ, शाबान राऊत, समीर लांजेकर, मोतीराम माने, विलास माने, अल्लाऊद्दीन चोचे,विश्वजीत माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.*
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा खा राऊत यांनी केला सत्कार
