कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा खा राऊत यांनी केला सत्कार

देवगड (प्रतिनिधी)
शालेय जीवन खरोखरच शिक्षणा बरोबर मौज मजा करण्याचे असते असे असताना आपल्या प्राथमिक माध्यमिक शालेय जीवनाचा एसएससी चा ३९ वर्षाचा काळ उलटला तरीही त्या काळातील जुन्या आठवणी आजही ताज्या ठेवून ऑनलाइन काळानंतर ऑनलाइन काळातही ऑफलाइन पद्धतीने एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा देत देवगड शेठ म.ग.हायस्कुलच्या १९८३ सालच्या २१ माजी विद्यार्थ्यांनी आपला स्नेहमेळावा विविध उपक्रमांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तोणदे येथील बंडू नागवेकर यांच्या हापूस ऍग्रो रिसॉर्ट मध्ये तो ही डुगवे येथील श्री लोटेश्वर दर्शनाने ,स्विमिंग पूल मधील मौज मजा ,नृत्या विष्कार नौकाविहार,नाईट जंगल सफारी,शेकोटी ,लज्जतदार भोजन, नाश्ता आणि फनिगेम्स आणि त्याचबरोबर या ३९ वर्षातील गोड मैत्रीच्या साक्षीने किंग ऑफ मेमरी आणि क्वीन ऑफ मेमरी या स्पर्धेतील पुरस्काराने विजेत्या मित्र मैत्रिणीचा भेटवस्तू देऊन गौरव करून हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला.
देवगड शेठ म.ग.हायस्कुल च्या १९८३ च्या देवगड बरोबर सिंधुदुर्ग,रत्नागिरी,मुंबई येथे व्यवसाय नोकरी निमित्त असलेले शालेय विद्यार्थी एकत्र येऊन जुन्या आठवणी ताज्या केल्या .ग्रुप प्रमुख श्रीपाद पारकर यांच्या नेतृत्वाखाली २१ शालेय मित्र मैत्रिणी एकत्र आल्या.देवगड हुन प्रवासास सुरुवात करून मुंबई येथून आलेल्या मित्र मैत्रिणींना सोबत घेतले.जंगलंमय भागात असलेले रिसॉर्ट प्रवासाचा वेगळा अनुभव ,एक प्रकारची जंगल सफरीच ,त्यातच स्नेहपूर्ण आदरातिथ्य यातून भारावून जात असताना त्याठिकाणी भेट झालेले रत्नागिरी मधील १९९२ सालचे एसएससी बॅच चा ग्रुप त्यांनीही ३९ वर्षाच्या ग्रुपचे कौतुक केले.मालवणी लज्जतदार जेवण ,मालवणी चटणी घावणे,थालीपीठ नाश्ता ,सारे काही आपलेच!सायंकाळी लाकडी वल्हा याच्या होडीतून नौका विहार,नाईट जंगल सफारी ,आणि मोकळ्या वेळेत फनिगेम्स ,दयानंद मांगले शिवराम निकम यांच्या संकल्पनेतून श्री हनुमान दत्तप्रसाद मासळी एजन्सी पुरस्कृत साकारलेला जनरल नॉलेज प्रश्न मंजुषा कार्यक्रमात किंग ऑफ मेमरी पुरस्कार अविनाश घाडी, तर क्वीन ऑफ मेमरी बहुमान पिरोज जाचक यांनी पटकाविला त्यांचा भेटवस्तू देऊन मित्र परिवाराचे ग्रुप प्रमुख्याच्या हस्ते गौरव करण्यात आला.मित्र मैत्रिणींनी भेट वस्तू ,खाऊ वाटप केले.यातच आंबा खोबरा बर्फी,चकली, कच्चा चिवडा,बेसन लाडू,लिमलेट -चिंच गोळ्याही सोबत असलयाने प्राथमीक जीवन जागे झाले.गोड गुलाबी थंडी,घनदाट आमराई ,जंगली श्वापदे पक्षी याचा सहवास खरच सारे काही मजेदार रिसॉर्ट मधील वस्तीची रात्र,दुसरा दिवस परतीचा सकाळचा मनसोक्त नाश्ता, लज्जतदार चहा,आणि आरे वारे बीच मार्गे विनायकी चतुर्थी दिनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथिल श्री गणेशाचे दर्शन महाप्रसाद,बीच भ्रमंती एक वेगळाच अनुभव .शेवटी रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावर मुंबई निवासी मित्र मैत्रिणींना निरोप आणि पुढील भेटीचे आमंत्रण ! त्यानंतर देवगड वासीय शालेय मित्र मैंत्रिणी चे सागरी महामार्ग द्वारे परतीचा प्रवास.एकंदरीत दोन दिवसांच्या स्नेह मेळावा हा ३९ वर्षातील स्मृतींना उजाळा देऊन गेला.

You cannot copy content of this page