नगरपालिका निवडणुकीत मंत्री केसरकर यांनी युतीसाठी प्रयत्न करू नये

मोती तलाव कठड्याच्या दुरुस्ती शुभारंभाचे निमंत्रण नसल्याने संजू परब संतप्त

⚡सावंतवाडी ता.२८-: मोती तलाव येथील कोसळलेल्या कठड्याचे भुमिपूजन फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांना घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. या भुमिपूजनला भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांला बोलवले गेले नाही. त्यामुळे भविष्यात होवू घातलेल्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीवेळी युती साठी सुध्दा फोन करून नये, असा इशारा भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

याबाबत संजू परब म्हणाले की मोती तलाव साफ करताना सर्व पक्ष्यांना बोलवल गेले होते मात्र आता भूमिपूजन वेळी इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना का बोलावलं गेलं नाही असा सवाल देखील संजू परब यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान हे निमंत्रण देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची होती. मात्र कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी अशा प्रकारची नाटके बंद करावीत, अन्यथा सत्ता काय असते हे त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page