माझी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा

उमेदवारी न मिळाल्यास पक्ष देईल त्याचे प्रामाणिक काम करणार;भाजप प्रवक्ते संजू परब यांनी भूमिका केली स्पष्ट

सावंतवाडी ता.२८-: विधानसभा निवडणुकी लढवण्याची माझी इच्छा आहे. परंतु पक्षाने उमेदवारी दिली आपण जरूर निवडणूक लढेन. अन्यथा इतर देतील त्या उमेदवारासाठी आपण प्रामाणिक काम करू असं मत भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले..

दरम्यान सावंतवाडी शहरात आपल्या काळात मंजूर झालेले छत्रपती शिवाजीमहाराजांचे स्मारक, सेल्फी पॉइंट ही कामे कोणी तरी जाणीवपूर्वक थांबवून ठेवली आहेत. ती का थांबली याचा अभ्यास सुरू आहे. लवकरच भांडाफोड करू, असा इशाराही त्यांनी दिला. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

You cannot copy content of this page