कलमठ-लांजेवाडी येथे 23 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा

⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुक्यातील कलमठ-लांजेवाडी येथील श्री. गणेश कृपा मित्रमंडळ यांच्यावतीने गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त २३ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ठिक ७.३० वा. भव्य जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम दहा येणाऱ्या संघाना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५,५५५/-, द्वितीय पारितोषिक ४, ४४४/-, तृतीय पारितोषिक ३,३३३/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सहभागी संघाना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा प्रवेश फी २०० रुपये राहील. स्पर्धेकरिता संपर्क श्री. सागर पाष्टे ९४२०७२६०१४, श्री. राहुल चव्हाण ९४२०७५२५७५, श्री. महेश परब ९४०४१६६१२८ यांच्याजवळ साधावा तसेच जिल्ह्यातील महिला फुगडी संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page