भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २७ रोजी

⚡मालवण ता.२४-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास उद्घाटक व प्रमुख पाहुणे भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर व जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांचा सत्कार, बेस्ट स्टुडंट पुरस्कार वितरण, कनिष्ठ महाविद्यालय आदर्श विद्यार्थी पुरस्कार, स्व. टेमकर स्मृति पुरस्कार वितरण होणार आहे. तसेच २७ रोजी दु. १२ वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर २८ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक वामन खोत, स्थानिक कमिटी पदाधिकारी, मुंबई कौन्सिलचे पदाधिकारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page