२५ रोजी प्रबोधन:जीवन विद्या मिशनचा कार्यक्रम
⚡वेंगुर्ला ता.२२-: सद्गुरु वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची व विश्वशांतीची उद्दिष्टे घेऊन सद्गुरुंच्या ‘हे जग सुखी व्हावे‘ व ‘हे राष्ट्र सर्वांगाने सक्षमपणे सर्व प्रगत राष्ट्राच्या पुढे जावे‘ हा संकल्प सिद्धिस नेण्यासाठी जीवनविद्या मिशन, वेंगुर्ला शाखेतर्फे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे ‘मनस्थिती बदला, परिस्थिती सुधारेल‘ यावर प्रबोधनाचे आयोजन केले आहे.
कोल्हापूर येथील सागर चव्हाण हे या प्रबोधनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उत्तम गावडे (९४०३१७७९९०) व अद्वैत सामंत (७६६६०२५२८२) यनी केले आहे.
