वेंगुर्लेत पुन्हा दिसणार “आठवणीतले खेळ”

माझा वेंगुर्ले तर्फे २४ ते २६ डिसेंबर कालावधीत आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२२-: ‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत कॅम्प येथील नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर ‘खेळ आठवणीतले‘ अंतर्गत जुने-नवे पारंपारिक खेळले जाणार आहेत.
यामध्ये हुतूत, लंगडी, साखळी, लगोरी, आट्यापाट्या, अची-पची, रिग-रुमाल, विटीदांडू, काजूंचे खेळ, ताईचा रुमाल, साईकल टायर, रिग-रनिग, स्लो सायकलिग, गजरे, आपरी-खापरी, डबाएक्स्प्रेस, भोवरे, धनगर-शेळी-वाघ, डोंगर की पाणी, खांब-खांब, रस्सी खेच, दोरी उडी, उठबस, पासरनिग आदी खेळांचा समावेश आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून या खेळांचा आनंद लूटावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजश्री कोल्ड्रिक्स (९४२३३०१३१०) किवा इंद्रनिल फोटो स्टुडिओ (९४२२९६४४१६) येथे संफ साधावा.

You cannot copy content of this page