२० ठिकाणी शिवसेनेचे, पाच ठिकाणी गाव पॅनल तर एक ठीकणी अपक्ष सरपंच
कुडाळ-
कुडाळ तालुक्यामध्ये ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून ५४ ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर 20 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहे तसेच 5 गाव पॅनल तर १ अपक्ष सरपंच विराजमान झाला आहे.
भाजपाचे 28 सरपंच निवडुन आले असुन यामध्ये केरवडे तर्फ माणगाव, तेर्सेबांबर्डे, साळगाव, पिंगुळी, हुमरस, शिवापुर, नेरूर कर्यात नारूर, नारूर कर्यात नारूर, रान बांबुळी, पडवे, आंदुर्ले, कवठी, चेंदवण, सरबंळ, सोनवडे तर्फ हवेली, परब वाडा पाट, बांबुळी, केरवडे कर्यात नारूर, जांभवडे, निरूखे, पांग्रड, भरणी, घोटगे, तुळसुली कर्यात नारूर, ओरोस, आंब्रड, सोनवडे तर्फ कळसुली.
शिवसेना 20 सरपंच निवडुन आले असुन यामध्ये तुळसुली, कालेली, पणदुर, अणाव, झाराप, निवजे, घावनळे, गावराई, बांव, नेरूर देऊळ वाडा, कुंदे, पावशी, वेताळ बांबर्डे, डिगस, पुळास, हिर्लोक, तेंडोली, माणगाव, आंबडपाल, मुळदे
गाव पॅनेल 5 सरपंच निवडुन आले असुन यामध्ये मांडकुली, बिबवणे, वाडीवरवडे, कडावल, आवळेगाव, व कसाल ग्रामपंचायतीवर सरपंच पदी अपक्ष निवडुन आले आहेत.
