भाजप तीन, शिंदे शिवसेना पाच तर ठाकरे शिवसेना एक
दोडामार्ग : २८ पैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीचे आज निकाल आले असून निवडून आलेल्या सरपंचांपैकी १८ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी गाव विकास पॅनल म्हणून सरपंच पदी विराजमान झाल्याचे जाहीर केले. तर भाजपाचे ३, बाळासाहेबांची शिवसेना ५ व ठाकरे शिवसेनेचा एक सरपंच निवडून आला. या निवडणुकीत फुकेरी सरपंच पद उमेदवाराअभावी रिक्त राहिले आहे. तर ठाकरे शिवसेना गटाला पिकुळे येथून मोठा धक्का बसला असून तालुकाप्रमुख संजय गवस यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यापैकी केर-भेकुर्ली, मोर्ले, विर्डी या तिन्ही ग्रामपंचायती सरपंच पदासहीत पूर्णतः बिनविरोध झाल्या. तर मणेरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद बिनविरोध झाले. या व्यतिरिक्त फुकेरी सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होते. या पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ते पद रिक्तच राहिले. त्या ठिकाणी इतर सदस्यांसाठी मतदान झाले. तर तालुक्यातील उर्वरित २३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी तर मणेरी व फुकेरी सदस्य पदांसाठी मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी पार पडली. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे फुकेरी सरपंचपदी उमेदवार न मिळाल्याने ते रिक्त राहिले आहे. तर सदस्य पदी सदाशिव सिताराम आईर ५९ मते, निलेश आनंद आईर ७२, ज्योत्स्ना शंभा आईर, सुशिला गजानन आईर, दिपाली दिलीप आईर, स्वाती लवू गावडे व आनंद जनार्दन गावडे हे बिनविरोध निवडून आले. झोळंबे गावच्या सरपंच पदासाठी शिंदे गटाचे विशाखा विश्वनाथ नाईक ४९१ मते विजयी व पार्वती नारायण वेटे २४२ मते पराभूत झाल्या. तर सरपंच पदासाठी मंगेश चंद्रकांत नाटेकर १९३ मते, संजना संजय गवस २२१ मते, विनिता विजय गवस २१९ मते, प्रभावती बाळकृष्ण गवस ८७ मते, सुभाष गोविंद गवस ८७ मते, उज्वला सखाराम कांबळे ९१ मते विनायक सदाशिव गाडगीळ ८१ मते, विजयी झाले.
कोलझर सरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनलच्या सुजल सूर्यकांत गवस ३९३ मताने विजयी झाल्या. शुभलक्ष्मी विष्णू देसाई ३४५ मते व अस्मिता हिरबा देसाई १२० मते पराभूत झाल्या. सदस्य पदासाठी प्रिया रघुनाथ देसाई २८९ मते, रोहन प्रमोद देसाई २०९ मते, समिधा समीर गवस १२० मते, पांडुरंग परशुराम राणे १५२ मते, विष्णू विश्राम नाईक १३५ मते व प्रमिला प्रकाश देसाई १३३ मते विजयी झाले.
मोरगाव सरपंच पदासाठी संतोष वसंत आईर ३३६ मते मिळवून विजयी झाल्या. लक्ष्मण नानू पालवेकर २४० मते व पांडुरंग मंगेश कदम ५९ मते पराभूत झाले. सदस्य पदासाठी अनुजा अनुभव पिळणकर, मेघा मंगेश पवार, देविदास महादेव पिळकर, खुशी भूषण कदम, सत्यवान नामदेव नाईक, संघमित्रा मधुकर कदम, भरत अंकुश गावडे हे बिनविरोध निवडून आले.
आडाळी सरपंच पदी पराग महादेव गावकर २८० मते मिळवून विजयी झाले. तर कमलाकर हरी सावंत १४४ मते व गोविंद ४३ मध्ये पराभूत झाले. सदस्य पदासाठी विशाखा विठोबा गावकर १०७ मते, निशा नितीन गावकर १०५ मते, परेश प्रकाश सावंत १९२ मते, लक्ष्मण लाडू मेस्त्री ८४ मते, संजना संजय गावकर ९० मते, सानिका राजन गावकर ८५ मते व अमोल दिलीप परत ८५ मतेमिळवून विजयी झाले.
आयी सरपंच पदासाठी तुषार तुळशीदास नाईक ४०९ मते मिळवून विजयी झाले. अनंत शिवा शेटकर २९९ मते व आनंद शिवबा मुरगोडे ९२ मध्ये पराभूत झाले. सदस्य पदी सुप्रिया तुकाराम कासार १७४ मते, अनिता सर्वेश शेटकर १७० मते, जयवंत पांडुरंग कासार १६० मते, वैभव वासुदेव शिरोडकर १२० मते, रितिका सखाराम जाधव १६३ मते, भदी वासुदेव गवस १२७ मते, रवींद्र श्रीकांत हरवाळकर १८८ मते मिळवून विजय झाले.
आंबडगाव सरपंच पदी स्नेहा सहदेव गवस ३७९ मते मिळवून विजय झाले. शुभदा रामा मयेकर १४१ मते पराभूत झाले. सदस्य पदासाठी मोहन विष्णू गवस १०१ मते, वासुदेव जयराम खरपालकर ९७ मते, मिळवून विजयी झाले. तर अनीषा अनिल गवस व नमिता नामदेव साठेलकर हे बिनविरोध निवडून आले.
तळकट सरपंच पदी सुरेंद्र संभाजी सावंत-भोसले ३९६ मते विजयी तर रामदास राजाराम देसाई १२७ मते व निळकंठ तुकाराम सावंत ८४ मते पराभूत व सदस्य पदासाठी विवेक काशीराम मळीक १३७ मते, दिव्या राघोबा राऊळ १२२ मते, रमाकांत शंकर गवस १२५ मते, पूर्वी दत्तप्रसाद सावंत १३४ मते, शशिकांत वासुदेव राऊळ ९९ मते विजयी तर नेहा नामदेव मळीक या बिनविरोध निवडून आल्या. उसप सरपंच पदी रुचिता प्रवीण गवस ४८३ मते विजयी, शुभदा भगवान गवस ४७८ मते पराभूत व सदस्य पदासाठी करुणा कृष्णा गवस २२७ मते, विनिता विलास मोरजकर २२६ मते, बळीराम विश्वनाथ नाईक २१५ मते, अशोक सखाराम नाईक १८१ मते, दिया देविदास गवस १७५ मते, वनिता वामन देसाई १७५ मते व दिनेश अनंत नाईक १८० मते विजयी झाले. कळणे सरपंच पदी अजित मनोहर देसाई ४२७ मते विजयी गणपत दत्ताराम देसाई २७८ मते, शुभम विष्णू देसाई ४४ मध्ये व संजय तुकाराम देसाई १० मते पराभूत तर सदस्य पदी भिकाजी आत्माराम देसाई 182 मते प्रिय प्रेमानंद नाईक १८८ मते हे निवडून आले. तर सुषमा प्रदीप सावंत, शितल बाबू खरवत, गिरीश बाळा नार्वेकर, प्रीती बाबुराव धुरी, विठ्ठल वामन नाईक हे बिनविरोध निवडून आले. परमे-पणतुर्ली सरपंच पदी प्रथमेश गजानन मणेरिकर २३२ मते विजयी तर आनंद भिवा नाईक २१८ मते व राजेंद्र कृष्णा उसपकर ३५ मते पराभूत तर सदस्यपदी बिंदिया बुधाजी बिर्जे १०४ मते, निश्चल हरी परमेकर ११३ मते, शैलेश शांताराम बोर्डेकर ११४ मतांनी विजयी तर दिया दीपक गवस, सुचित्रा शंकर गवस, सुनील भिकाजी गवस, संजना धोंडू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. माटणे सरपंच पदी महादेव दत्ताराम गवस ५४७ मते विजयी, चंद्रकांत जयराम शिरोडकर ३३३ मते पराभूत तर सदस्य पदी विठ्ठल वासू नाईक १९७ मते विजयी झाले. तर संजना संजय गवस, सागर सारु गवस, चांदनी चंदन शिरोडकर, तनया तुळशीदास शिरोडकर, उमेश सखाराम शिरोडकर, अश्विनी अशोक शिरोडकर नीलम नितेश पिरणकर, पांडुरंग कृष्णा गवस हे बिनविरोध निवडून आले. सासोली सरपंच पदी बळीराम कृष्णा शेटे ६२५ मते विजयी, तर गिरीश कृष्णा डिचोलकर १७० मते व मोहन नारायण पारकर १४२ मते पराभूत, सदस्य पदी अनिरुद्ध अविनाश फाटक ११९ मते व १९२ मते, सुमन ज्ञानेश्वर नाईक २५८ मते व अरुण जयंद्रथ नाईक १५८ मतांनी निवडून आले. तर शशिकांत प्रकाश पारकर, प्रणिता प्रकाश ठाकूर, जागृती जयंद्रथ सासोलकर व अनुष्का अजित गवस या बिनविरोध निवडून आल्या. अविनाश फाटक यांनी प्रभाग एक व प्रभाग दोन मधून उमेदवारी अर्ज दाखल केले व या दोन्ही प्रभागात त्यांनी विजय संपादन केला.
घोटगेवाडी सरपंच पदी श्रीनिवास मुकुंद शेटकर ३०९ मते विजयी, गजानन रामचंद्र वाडकर २६७ मते पराभूत झाले. तर सदस्य पदी प्रीती मुरलीधर भणगे, रूपाली गुंडू करमळकर, सागर विश्वनाथ कर्पे, सुचिता अंकुश नाईक, नूतन सतीश पांगम व विठ्ठल बाबाजी दळवी हे बिनविरोध निवडून आले. तळेखोल सरपंच पदी वंदना आनंद सावंत ३०२ मते विजयी तर अनिशा कृष्णा गवस ५१ मते व भगीरथी रामचंद्र गवस ८५ मते पराभूत तर सदस्य पदी उर्मिला उत्तम गवस ९७ मते, सुरेखा केशव शेळके १३० मते, श्याम शंकर गवस ११९ मते, भरत दशरथ सावंत १४० मते विजयी झाले. तर सिंचल रामचंद्र सावंत, महादेव दशरथ नाईक व गिरिजा गजानन दळवी हे बिनविरोध निवडून आले. वझरे-गिरोडे सरपंच पदी सुरेश सदाशिव गवस ४२२ मते विजयी तर समीर लक्ष्मण म्हावसकर ३३३ मते व अर्जुन ज्ञानेश्वर गवस १६१ मते पराभूत तर सदस्यपदी विनया विनायक गवस २३६ मते, गौतमी गोविंद तिर्डीकर २१७ मते, समीर कृष्णा पर्येकर १८७ मते, शितल सुनील गवस १०५ मते, विकास अनंत गावडे ११५ मते, चंद्रकांत विष्णू नाईक २५७ मते व बाळा नागेश शिरोडकर १६७ मते विजयी झाले. तर मोहिनी मोहन खोत या बिनविरोध निवडून आल्या.
पिकुळे सरपंच पदी आप्पा वसंत गवस ३४३ मते विजयी, तर कैलास गणू गवस २५१ मते, रामचंद्र बाबाजी गवस १८२ मते, विनय वसंत गवस १७ मते, संजय कृष्णा गवस १७१ मते, विशाल वासुदेव नाईक ४५ मते, वसंत कृष्णा गवस ७ मते पराभूत झाले. तर सदस्य पदी निशा नारायण गवस १२१ मते, रुक्मिणी पायाजी गवस १०९ मते, निलेश गुरुदास गवस १११ मते, शंकर रामचंद्र गवस २१० मते, योगिता दत्ताराम सावंत २३१ मते, रत्नदीप फटी गवस २८१ मते व रामा लवू नाईक २४३ मते विजयी झाले. खोक्रल सरपंच पदी देवेंद्र रामकृष्ण शेटकर २३१ मते विजयी तर प्रमोद वासुदेव गवस ९१ मते पराभूत, सदस्य पदी साक्षी साईनाथ गवस १०० मते, हेमा भरत गवस ९३ मते, भरत लक्ष्मण गवस ९६ मते, देवेंद्र रामकृष्ण शेटकर ८३ मते विजयी झाले. तर लेखा लक्ष्मण गवतस, सागर न्हानू नाईक, अंजू महादेव गवस विजयी झाले. तेथील सरपंच पदी पुन्हा एकदा दैवैंद्र शेटकर विराजमान झाले असून ते सरपंच पदी तसेच प्रभाग दोन मधूनही निवडून आले आहेत. कोनाळ सरपंच पदी अस्मिता अनिल गवस ३४९ मते विजयी, रिया राजन लोंढे २०५ मते, माया दयानंद लोंढे ३२१ मते, सुचिता सुरेश बांदेकर २५ मते पराभूत तर सदस्य पदी रत्नकांत रामदास कर्पे १८३ मते, शुभ्रा शिवाजी लोंढे १७३ मते, द्रोपदी विष्णू लोंढे १७० मते, प्रीतम प्रकाश पोकळे १७३ मते, सुधाकर अर्जुन बांदेकर १८१ मते निवडून आले. तर संजीवनी शिवराम शिरवलकर, कौशिकी केशव पोकळे, रुपेश लक्ष्मण ठाकर व गौतमी गुरुदास शेटवे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
बोडदे सरपंच पदी हरिश्चंद्र गंगाराम नाईक ३९३ मते विजयी तर दयानंद मोगरा नाईक ३६५ मते पराभूत तर सदस्य पदी कशिश किशोर मयेकर १२९ मते, विनायक मनोहर शेटये ८३ मते विजयी तर दीपिका दीपक घाडी, सुजाता सूर्यकांत गवस, महादेव शंकर गवस, ज्ञानेश्वर आत्माराम हरिजन, लीना एडविन फर्नांडिस हे बिनविरोध निवडून आले. घोटगे सरपंच पदी भक्ती भरत दळवी २५४ मते विजयी, शुभेच्छा सुहास दळवी २२९ मते व पूर्वा परेश धुरी १५९ मते पराभूत, सदस्य पदी तृप्ती विनय दळवी १४१ मते, मंदिरी महेश जाधव ९९ मते, विजय प्रकाश दळवी ११२ मते, अजय वासुदेव दळवी १०३ मते निवडून आले. तर समीक्षा सतीश दळवी, राधा कृष्णा गावडे, कृष्णा विष्णू वारंग हे बिनविरोध निवडून आले. मांगेली सरपंच पदी सुनंदा अजित नाईक ४५० मते विजयी तर सुप्रिया लाडू नाईक ३४५ मते पराभूत तर सदस्य पदी सुचिता चंद्रकांत गवस २४० मते, रिया राजन गवस २३९ मते, संदीप कृष्णा गवस २१२ मते निवडून आले. राजेश्याम अर्जुन नाईक, सुविधा श्रीपद गवस, मयुरी रामचंद्र गवस, श्रेयाली सुभाष गवस, कृष्णा सातू गवस, सुनील राजाराम गवस हे निवडून आले. झरेबांबर-आंबेली सरपंच पदी अनिल दत्ताराम शेटकर २७७ मते विजयी, नितीन नारायण गवस १४४ मते, गंगाराम यमु खरवत १६९ मते, आनंद अंकुश तळणकर १८० मते, चंदन अंकुश नाईक ६९,यतेश श्रीकांत गोवेकर १०४ मते पराभूत तर सदस्य पदी उमेश तुकाराम सातार्डेकर १६२ मते, अंकिता गोपाळ साळगावकर १८९ मते, स्मिता बाळकृष्ण तेंडुलकर १४२ मते, झिलू चांगलू शेळके १६९ मते, संजना सुधाकर आजरेकर१७२ मते विजयी तर राधिका राघोबा सावंत, सर्वेश दिलीप माणगावकर, श्याम विठ्ठल नाईक, निता प्रकाश नाईक, संगीता अंकुश जाधव बिनविरोध निवडून आले. मणेरी सरपंच पदी सिद्धी गणपत कांबळे बिनविरोध निवडून आले. तर सदस्य पदी विजया महेश शिरंगेकर २०३ मते, विशाल मोहन परब १६३ मते, विशांत नारायण तळवडेकर ९१ मते, शामल चंद्रशेखर भुजबळ २२७ मते, राया बिरू काळे ३१३ मते निवडून आले. रोशनी रामदास कांबळे, नीता निलेश घुरे, मनीषा विष्णुदास नाईक, शिवराम विनायक मोर्लेकर बिनविरोध निवडून आले.
मोर्ले सरपंच पदी संजना सचिन धुमासकर बिनविरोध तर सदस्य पदी दीप्ती दिनेश मणेरीकर, संतोष जोमा मोर्ये, गौरी बाळा देसाई, गायत्री गोपाळ गवस, प्रकाश नारायण सुतार, सत्यवान चंद्रकांत बेर्डे, दिव्या गोविंद गवस हे बिनविरोध निवडून आले. विर्डी सरपंच पदी सुशांत शंकर नाईक बिनविरोध तर सदस्य पदी उर्मिला उत्तम गवस, पद्मजा प्रभाकर गवस, एकनाथ विष्णू गवस, दीक्षा दत्तप्रसाद बांदेकर, देविदास महादेव जाधव, सुरेश कृष्णा गवस, निकिता ज्ञानेश्वर गवस बिनविरोध निवडून आले. केर-भेकुर्ली सरपंच पदी रुक्मिणी मुकुंद नाईक बिनविरोध तर सदस्य पदी मेघना महादेव देसाई, लक्ष्मी नारायण धुरी, गायत्री गणपत देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, तेजस तुकाराम देसाई, प्रियंका मंगेश देसाई, यशवंत राजाराम देसाई बिनविरोध निवडून आले. कुंब्रल सरपंच पदी जनार्दन बाबू गोरे ४१९ मते विजयी, सुरेश बाबू ताटे ४०४ मते पराभूत तर सदस्य पदी अमित दत्ताराम सावंत २२१ मते, सुषमा सूर्यकांत बोर्डेकर ११४ मते, संजय महादेव परब १२३ मते निवडून आले. तर अनिता प्रदीप सावंत व आरती अनिल सावंत यांना प्रत्येकी १११ मते मिळाल्याने तेथे टाय झाली. अखेर चिठ्ठी टाकून तेथे विजयी झाल्या. करुणा मधु कदम, नीलिमा नारायण नाईक, वैभव विजय सावंत हे बिनविरोध निवडून आले.
