मिठमुंबरी ग्रा प सरपंच पदी अपक्ष उमेदवार विजयी!
⚡देवगड ता.२०-: देवगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणी मंगळवारी सकाळी प्रारंभ होऊन देवगड तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्राप्त केले आहे असून तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायत पैकी २० हुन अधिक ग्रा प वर भाजपचे सरपंच व सदस्य विराजमान झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ८ ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. तर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीवर गाव पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.यातील काही गाव पॅनल वर शिवसेनेने दावा केला असून एकूण .देवगड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या ३८ पैकी १३ ग्रा प वर शिवसेनेने दावा केला आहे.भाजपच्या अधिपत्याखाली
पडेल,किंजवडे,गिर्ये,नारीग्रे,बापर्डे,हडपीड,कोटकामते या ग्रा प बरोबर कुणकवण,चांदोशी,कुवळे, पोयरे,सांडवे, दहिबाव,तोरसोळे, वाघिवरे,म्हाळुंगे,उंडील -व अन्य या ग्रा प चा समावेश आहे.
तालुक्यात एकूण ३८ पैकी १३ ग्रा प वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी दावा केला आहे .तूर्तास शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने,खुडी,मणचे , साळशी,ओंबळ,नाद,बुरबावडे,
फणसे, ,सौंदाळे,या ग्रा प चा समावेश असल्याचे समजते.तर गाव पॅनेलने पाटगाव चाफेड,कट्टा,हिंदळे, पोंभुरले ,साळशी, गवाणे, पेंढरी या ग्रा प चा समावेश आहे . मिठमुंबरी या एका ग्रामपंचायतीवर सरपंच पदाकरिता अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
: तालुक्यात ३३ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयामध्ये सुरू झाली आहे. एकूण१२ फेऱ्यात ११ टेबलावर हि मतमोजणी झाली देवगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. निवडणूक शांततेत पार पडली.मतमोजणी कक्षात तहसीलदार स्वाती देसाई,महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर ,निवासी नायब तहसीलदार विवेक शेट तसेच ग्रा प निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला आहे.तालुक्यातील एकूण राजकीय वातावरण लक्षात घेता प्रत्येक गावात चुरशीचे मतदान पाहायला मिळाले.
तालुक्यातील एकूण९५ मतदान केंद्रांवर ६३.७६ टक्के इतके मतदान झाले.
मत मोजणी ११ टेबलावर होणार करण्यात .पहिल्या तीन फेरीत अकरा ग्रामपंचायती मतमोजणी झाली. ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी देवगड तालुक्यात सर्वाधिक ग्रा प वर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व आम.नितेश राणे,माजी आम.अजित गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी यांनी प्राप्त केले आहे..मतमोजणी निकाल जाहीर होताच भाजपचे माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम,शहर अध्यक्ष योगेश पाटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,अतुल रावराणे तालुका प्रमुख मिलिंद साटम जयेश नर ,नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी. जल्लोष केला.दरम्यान तालुक्यात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनामार्फत संबंधित उमेदवार याना नोटिसा बजाविल्या असल्याने विजयी जल्लोष करण्यास मर्यादा आल्याने विजयी उमेदवारात नाराजी व्यक्त होत आहे.
देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता..
देवगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत पैकी ५ ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या .या शिवाय अन्य ३ ग्रा प चे सरपंच बिनविरोध झाल्याने देवगड तालुक्यात एकूण ८ सरपंच आणि १४६ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते उर्वरीत सरपंच पदासाठी ११० वैध अर्जापैकी २८ सरपंच पदाचे अर्ज मागे घेतल्याने सरपंच पदाचे ८२ अर्ज होते.तर सदस्य पदासाठी ४८७ अर्जा पैकी ४२ अर्ज मागे घेतले.४४५ उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात होते.
तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून यात प्रत्यक्ष २९ ग्रामपंचायतीचे सरपंच निवड व ३३ग्रामपंचायत चे सदस्य निवड होणार आहे.या पैकी विजयदुर्ग ग्रा प चे सरपंच पद अनुसूचित जाती जमाती उमेदवार नसल्यांने सरपंच पद रिक्त रहाणार आहे .
देवगड तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेले ग्रा प निहाय ८सरपंच पुढील प्रमाणे आहेत.
ग्रामपंचायत आरे -ममता सतीश कदम, ग्रामपंचायत चाफेड -किरण लीलाधर मेस्त्री, ग्रामपंचायत गवाणे -नयना प्रदीप आयरे, ग्रामपंचायत कट्टा -श्वेता समीर कोयंडे, ग्रामपंचायत गोवळ दक्षता दिनेश मेस्त्री, ग्रामपंचायत पाटगाव, नितेश सहदेव गुरव, ग्रामपंचायत पोंभुरले- प्रियांका संजय धावडे ,ग्रामपंचायत कुणकवण -वैशाली विजय पांचाळ,यांची सरपंच निवड बिनविरोध झाली आहे. याची अधिकृत घोषणा २० डिसेंबर रोजी करण्यात आली . या व्यतिरिक्त तालुक्यातील अन्य ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पुढील प्रमाणे उमेदवार रिंगणात उतरले होते. ग्रामपंचायत बापर्डे- बाळकृष्ण गणपत नरसाळे,(३११) संजय हनुमंत लाड,(६५९-विजयी) ग्रामपंचायत चांदोशी- सुभाष वासुदेव जुवेकर,(९६) दिपाली दिलीप मेस्त्री,(१९३-विजयी) . ग्रामपंचायत हडपीड -संध्या प्रकाश राणे,(१४६-विजयी) वासंती शिवाजी बागवे, (११६)ग्रामपंचायत हिंदळे -मकरंद केशव शिंदे(५१४-विजयी), साबाजी अर्जुन राणे,(१६) संतोष भिकाजी गावकर (२३१),विद्याधर सूर्यकांत प्रभू (३०६) ,ग्रामपंचायत- खुडी दीपक नारायण कदम, (४१५-विजयी)नंदकिशोर अर्जुन भाट(३४२), ग्रामपंचायत किंजवडे- संतोष म.किंजवडेकर (९३१-विजयी) दिगंबर मोहन घुमडे(५४९) ,ग्रामपंचायत कोटकामते- प्रजोल दिनेश राणे, (४०२)ऋतुजा राकेश खाजनवाडकर(४५०-विजयी) ग्रामपंचायत कुवळे- सुभाष बाळकृष्ण कदम (५३६-विजयी)भारत वसंत कदम(१३०) ग्रामपंचायत -मिठमुंबरी-बाळकृष्ण आत्माराम गावकर(१३३)-विजयी ,गणेश जगदीश गावकर ,(१०३)रमेश मनोहर तारी,(६१) नरेश सखाराम डामरी(,११२) यशवत राजाराम डामरी (९६).
ग्रामपंचायत नाद -दिलीप राजाराम आंग्रे,(४८) संतोष प्रकाश तेली(९५ ),प्रवीण सिताराम पाष्टे(१५०-विजयी), संतोष पांडुरंग बाणे,(६०) महेश रामचंद्र पोयरेकर (८५) .ग्रामपंचायत नारिंगे- मनोज जयवंत भावे(३०१), महेश वसंत राणे, (४९०-विजयी)ग्रामपंचायत फणसे -मंदार दीपक केळकर,(१७६) अमित अरुण फणसेकर(२१६-विजयी) ग्रामपंचायत पोयरे -गीता गणपत राणे(२६७-विजयी) ,विनया विश्वास पेडणेकर(२६२) ग्रामपंचायत साळशी- नम्रता श्रीनिवास माळवदे,(११५) वैशाली विजय सुतार (३६७-विजयी),ग्रामपंचायत ओंबळ-उमेश हरी पवार(११९, )अरुण राजाराम पवार,(१५६-विजयी) ग्रामपंचायत सांडवे- भगवान दत्ताराम परब (१७९विजयी)संदीप शंकर मिठबावकर,(९०) दहिबाव -पुरुषोत्तम अरुण रूमडे(२८१) ,सचिन दिनकर नाचणकर(५१९) ग्रामपंचायत तोरसोळे स्वरा संतोष पवार, (२५२)सुमित्रा विलास पवार,(७१) तेजस्विनी प्रकाश पवार (२७२-विजयी)ग्रामपंचायत वाघीवरे- रामचंद्र गणपत कोकरे( ९०)राजन मोहन लाड(१८०-विजयी )सुनील शिवाजी लाड(१५०) .
ग्रामपंचायत महाळुंगे -अमोल रामचंद्र यादव(२१०) (,संदीप शाहू देवळेकर, (३५९ -विजयी)ग्रामपंचायत गिर्ये – लता दिलीप गिरकर, (६६०-विजयी))सानिका किशोर घाटये(६५७),ग्रामपंचायत सौंदाळे ,-मनाली सूर्यकांत कामतेकर ,(५७८-विजयी)मनीषा मोतीराम तावडे(५०२) ,ग्रामपंचायत वाघोटन- सावली मंगेश परब,(४७३) संजना संदीप वानिवडेकर(४८९-विजयी) ग्रामपंचायत विजयदुर्ग रिक्त ग्रामपंचायत -पेंढरी- प्रमोद मारुती घाडीगावकर,(२३०)( मंगेश रामचंद्र आरेकर,(२४५-विजयी) ग्रामपंचायत उंडील- दीप्ती दिलीप काळे ,(१०९)उज्वला बाळकृष्ण यादव,(१२२-विजयी) रिया व्यंकटेश्वर नर (९९)ग्रामपंचायत बुरबावडे-अनुष्का जितेंद्र शिंगे, (१६२-विजयी)मनीषा लक्ष्मण सावंत(१५२), ग्रामपंचायत मणचे दयानंद वामन घाडी,(२५६) रघुनाथ श्रीपत घाडी २३३),दीपक जगन्नाथ तोरस्कर,(५६०-विजयी) ग्रामपंचायत पडेल -अमित काशिनाथ घाडी,(२२३)चंद्रकांत देऊ तानवडे(३०१), भूषण रामदास पोकळे,(८६३-विजयी) वैभव रघुनाथ
वारीक (३१५)ग्रा प दाभोळे श्रीकृष्ण अनभवणे (४४२-विजयी),राजेंद्र घाडी (४०२),अक्षय धुरी (६५),मोतीराम घाडी (२३२)याप्रमाणे सरपंच पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.असून बहुतांशी ठिकाणी दुरंगी तिरंगी तर काही ग्रामपंचायतीमध्ये चौरंगी,पंचरंगी लढत झाली होती. एकंदरीत गावागावातून गाव पॅनेलला प्राधान्य देत सरपंच पदाचे उमेदवार निवडण्यात आल्याचे समजते परंतु काही सरपंच पदाच्या उमेदवार यांना राजकीय पक्षाने पुरस्कृत केल्याने या सरपंच पदांवर संबंधित राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपला दावा करीत आहे .
