⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ – ओरोस क्रीडा संकुल येथे झालेल्या सावंतवाडी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले. यामधे १७ वर्षे वयोगटातून २०० मीटर धावणे या प्रकारात कुमार सुनील सुभाष जंगले द्वितीय क्रमांक तर लांब उडी (वयोगट १७ ) या स्पर्धेमध्ये कुमार प्रतीक जाधव याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विभागस्तरीय होणाऱ्या मैदानी स्पर्धांसाठी या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
या सर्व खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री नारायण शंकर केसरकर तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री अरुण भिसे, श्री जितेंद्र म्हापसेकर, लवलेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी प्रशालेचे वर्षा बल्लाळ, गझल शेख यांची विशेष मदत लाभली. या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पै, सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, मुख्याध्यापक श्री एम. पी. मानकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांचेकडून करण्यात आले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
