भाजपच्या ताब्यातील नेमळे ग्राम पंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतली ताब्यात

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा करिश्मा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ पॅनलचा पराभव

सावंतवाडी,ता.२०: भाजपच्या ताब्यात असलेली नेमळे येथील ग्रामपंचायत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दीपिका बहिरे या निवडून आल्या आहेत.

तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे तथा विद्यमान सरपंच विनोद राऊळ यांच्या पॅनलला पराभव सहन करावा लागला.

शिवसेनेचे आणखी ८ सदस्य त्या ठिकाणी निवडून आले आहेत. तर भाजपाला फक्त तीनच जागेवर समाधान मानावे लागले.

You cannot copy content of this page