एस.टी.तून धूर येऊ लागल्‍याने प्रवाशांची उडाली धावपळ

⚡कणकवली ता.२०-: कणकवली ते मालवण जाणाऱ्या एस.टी. बसमधून तहसीलदार कार्यालयानजीक महामार्गावर अचानक धूर येऊ लागला. यात कुणीतरी एस.टी.ला आग लागल्‍याची अफवा पसरवली. यामुळे घाबरलेल्‍या प्रवाशांनी एस.टी.च्या खिडकीतून उड्या मारल्‍या.


कणकवली तहसील कार्यालयासमोर ही घटना घडली. यावेळी प्रवाशांची धावपळ पाहून तेथे बंदोबस्तासाठी असलेल्‍या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. कणकवली आगरातून असरोंडी, असगणी मार्गे मालवणला जाणारी एस.टी. बस सायंकाळी पाचच्या सुमारास कणकवली स्थानकातून निघाली होती. ही बस तहसील कार्यालयासमोर आल्‍यानंतर बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्‍यामुळे चालकाने बस थांबवली. यात कुणीतरी प्रवाशाने एस.टी. बसला आग लागली अशी आरोळी ठोकली. त्‍यामुळे घाबरलेल्‍या प्रवाशांनी खिडकीतून बस बाहेर उड्या मारल्‍या. यावेळी तेथील नागरिकांनीही बसमधील प्रवासी तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना बस बाहेर काढण्यास मदत केली.

You cannot copy content of this page