मडुऱ्यात वयोवृद्धांचा मतदानास प्रतिसाद

संजू परब यांच्या पॅनलच्या विजयासाठी वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क..

⚡सावंतवाडी ता.१८-: ग्रामपंचायत निवडणुकीत मडुऱ्यात भाजपचे संजू परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात गाव पॅनलने एक मूठ बांधल्याने संजू परब यांच्या पॅनलला विजयी करण्यासाठी आता वयोवृद्धांनी सुद्धा मतदानास पुढाकार घेऊन उत्स्फूर्त मतदान केले. त्यामुळे संजू परब यांच्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचे जाणकार वयोवृद्ध मतदारांनी सांगितले.

संजू परब पॅनलचे प्रमुख तथा भाजप सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनीही जवळजवळ आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली. गावात अनेक ठिकाणी वयोवृद्धांना मदतीचा हात देऊन संजू परब यांनी त्यांच्यात दडलेली आपुलकी दाखवून दिली.

You cannot copy content of this page