तीव्र आंदोलन करण्याचा युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत
मालवण दि. १७ ( प्रतिनिधी )
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण – बेळणे या रस्त्यासाठी २,२८,४७,५२८ रु. एवढा निधी मंजूर झाला असून २५ ऑगस्ट २०२१ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असतानाही हे आदेश देऊन आता १ वर्षे ४ महिने होत आले तरी देखील काम पूर्ण न करण्यात आल्याने ग्रामस्थांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे त्यामुळे २ जानेवारी २०२३ पर्यंत मालवण-बेळणे रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात मालवण – बेळणे रस्त्यावर कातवड तिठा (आचरेकर दुकान) येथे सकाळी ६ वाजल्यापासून तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांनी दिला आहे.
मालवण – बेळणे या रस्त्यासाठी २,२८,४७,५२८ रु. एवढा निधी मंजूर झाला असून २५ ऑगस्ट २०२१ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असतानाही हे आदेश देऊन आता १ वर्षे ४ महिने होत आले तरी काम झाले नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हे ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे ठेकेदाराबरोबर या अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
हा रस्ता खड्डेमय झाला असून ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे पोईप, विरण, बागायत, बिळवस, महान येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय सदरील रस्त्यावर अनेक अपघात झाले असून बळी देखील गेलेले आहेत. तसेच जेवढे काम संबंधित ठेकेदाराने केले आहे ते सुध्दा अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कातवड येथे रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ताच पुन्हा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. २ जानेवारी २०२३ पर्यंत मालवण-बेळणे रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात मालवण – बेळणे रस्त्यावर कातवड तिठा (आचरेकर दुकान) येथे सकाळी ६ वाजल्यापासून तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांनी दिला आहे.
