कणकवलीत भाजपने जाळला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पुतळा

भारताचा अपमान व पंतप्रधान नरेंद्र मोदी वरील वादग्रस्त विधानाचे उमटले कणकवलीत पडसाद

⚡कणकवली ता.१७-: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी भारत देशाचा अपमान करणारे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे कणकवलीत तीव्र पडसाद उमटले. आम. नितेश राणे,
भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्या मार्गद्शनाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बिलावर झरदारी भुट्टो यांचा पुतळा जाळला व वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयासमोर हा पुतळा जाळण्यात आला. यावेळी नीम का पत्ता कडवा है बिलावल भट्टो भडवा है.. मोदीसाहेब तुम पाकिस्तान मे घुसो हम तुम्हारे साथ है!! बिलावर भुट्टोचे करायचे काय ? खाली डोके वर पाय..! बिलावर भुतो हाय हाय…! भारत माता की जय..! वंदे मातरम..! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाकिस्तानने भारत देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये, प्रदेश सदस्य सौ. प्रज्ञा ढवन, सौ राजश्री धुमाळे,तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके,सौ. प्राची करपे,श्री.गणेश तळगावकर,संतोष उर्फ पप्पू पुजारे,श्री.गुलाबराव चव्हाण, सागर राणे,आशिष वालावलकर,सुभाष मालंडकर, बाबू गायकवाड ,प्रदीप ढवन, संजय कामतेकर महेश सावंत, किशोर राणे, बाळा सावंत, बाळा पाटील,सागर राणे, मिलिंद चिंदरकर, पंढरी वायंगणकर, ओंकार सुतार,अभय राणे आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्तानचे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही असे यावेळी आम. नितेश राणे म्हणाले.जो व्यक्ती राष्ट्रावर प्रेम करतो. हिंदुस्तानवर प्रेम करतो तो देशाच्या पंतप्रधानांचा अपमान कधीही सहन करणार नाही. खरा हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही अपमान सहन करणार नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो यांनी जे काही अपशब्द वापरले आहेत ते आम्ही कधीही सहन करणार नाही. असा संदेश पाकिस्तान पर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणूनच बिलावर भुट्टोच्या पुतळ्याचे दहन कणकवलीत आम्ही केलेले आहे.
महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी पाकिस्तान जिंदाबाद किंवा पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर अशा व्यक्तीची जीभ छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा सज्ज इशारा भाजपाचे आम. नितेश राणे दिला आहे.

You cannot copy content of this page