⚡कणकवली ता.१६-: कुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत श्री कुर्लीदेवी ग्रामविकास आघाडी परिवर्तन पॅनलला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिली.
कुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर करीत पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रणाली प्रकाश राणे, बापू तुकाराम चव्हाण, नलिनी नरेश पाटील, , स्वाती सूर्यकांत परब, योगेश कदम या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वैभव रावराणे यांनी केले.
