माजगावात महा विकास आघाडीला धक्का देणारच

परिवर्तन अटळ: भाजप – शिंदे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी ता.१५: येथील तालुक्यातील बहुचर्चित असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत
महाविकास आघाडी समोर भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेने मोठे आव्हान उभं केलं असून थेट सरपंच पदासाठी डाॅ. सौ. अर्चना सावंत मैदानात उतरल्या आहेत.‌
पाचही प्रभागात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून माजगावात यंदा परिवर्तन करून महाविकास आघाडीला धक्का देणार असल्याचा विश्वास सौ. अर्चना सावंत यांनी व्यक्त केलाय. तर माझ्यासह भाजप युतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सौ. सावंत यांनी केला.

You cannot copy content of this page