*💫मालवण दि.०८-:* सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी माटुंगा- मुंबई तर्फे मुंबईच्या नायर रुग्णालयात मेट्रन या पदावर कार्यरत असणाऱ्या सिंधू कन्या सौ. ऋचा साळगांवकर यांचा मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते कोविड १९ वॉरियर्स हा बहुमान देऊन नुुकताच गौरव करण्यात आला. यावेळी मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल चहल, डॉ. दिलीप त्रिवेदी,पोलीस आयुक्त परमवीर सिंग, आयपीएस कुलावंत सरंगल, डॉ मुझफर लकडवाला, चंद्रशेखर चोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ऋचा साळगावकर याना या पूर्वीही त्यांनी लॉक डाऊन कालावधीत जीवाची बाजी लावून मुंबई मध्ये केलेल्या कामाचा विविध ठिकाणी गौरव करण्यात आला होता.
सिंधुकन्या नायरच्या ऋचा साळगांवकर कोरोना योद्धा म्हणून सन्मानित…!_
