वेत्ये गावात गुणाजी गावडे यांचे पॅनल सुसाट

ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनलला मोठा प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.१४-: वेत्ये येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे आणि सदस्यापदाच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या पॅनलला मतदारांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे घरोघरी विकासाचे व्हिजन घेऊन त्यांनी प्रचारावर जोरदार भर दिला आहे.

एकूणच त्यांच्यासोबत असलेली युवा पिढी आणि गावातील जाणती राजकीय मंडळी लक्षात घेता सद्यस्थितीत गावडे यांच्या पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे. गुणाजी गावडे यांनी आपली निशाणी रिक्षा घरोघरी पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या हातात घेतल्या आहेत. युवा पिढीचा खंबीर पाठिंबा त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे गावागावात गुणाजी गावडे आणि त्यांच्या पॅनलची चर्चा सुरू आहे.

You cannot copy content of this page