⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा* *माहिती *कार्यालयातील लिपीक संदीप राठोड यांना वरीष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर येथे बदली झाली . त्यानिमित्त आज कार्यालयाच्यावतीने श्री. राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. राठोड सन 2013 पासून जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. कार्यालयातील अनेक कामे त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. श्री. राठोड अत्यंत शांत व सुस्वभावी, कामसू कर्मचारी आहेत. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी श्री. राठोड यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसंपादक रणजित पवार,लिपीक रवींद्र देवरे, वाहनचालक अमित राणे, शिपाई महेंद्र भालेकर, कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे सेवा निवृत्त लेखापाल चंद्रकांत कारीवडेकर उपस्थित होते.
